नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज ठाकरे यांनी आज त्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या शेतकर्यांना तुम्ही मला मतदान करत नाहीत असे म्हणत फटकारल्याची घटना घडली.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज देखील नाशिकमध्ये आहेत. दरम्यान, आज सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकर्यांनी आज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी तुम्ही मला मतदान करत नाही, मग अडचणींच्यावेळी माझ्याकडे का येत? असे अनेक संतप्त सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी शेतकर्यांना खडे बोल सुनावले. ?
या संदर्भात राज ठाकरे म्हणाले की, मध्यंतरी शेतकर्यांनी संप केला होता. तेव्हा काही शेतकरी बांधव मला भेटायला आले होते. मी त्यांना सांगितलं, अडचणींच्या काळात माझ्याकडे येता आणि मतदानाच्या वेळी मतदान त्यांना करता. त्यावेळी मला शेतकरी बांधव म्हणाले, साहेब अडचण वेगळी आणि मतदान वेगळं. जे तुम्हाला मदत करत नाही त्यांना तुम्ही मतदान करत आलात तर अडचणींच्या काळात तुम्ही माझ्याकडे का येता? ज्यांनी सांगितलं होतं की, आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करतो त्यांना तुम्ही मतदान केलंत की नाही? असे सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला.