जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील तिघ्रे शिवारातील शेत गटातून २ लाख २१ हजार ३०० रुपयांचा मुरुम चोरी केल्याप्रकरणी एका कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शेळके कन्सट्रक्शन ऍन्ड यश बिल्डर ऍन्ड कन्सट्रक्शन कंपनी खोंडापुर ता. शिरुड जि. पुणे यांनी सन २०१८ मध्ये रेल्वे लाईन नंबर-३ च्या कामाचा घेतलेल्या ठेक्यासाठी त्यांनी तिघ्रे शिवारातील जमिन गट नंबर १ मधून मुरुम उचण्याचा ठराव झाला होता. याबाबत जळगाव तहसील कार्यालयात रॉयल्टी भरली असतांना तसेच त्यांना गृप ग्रामपंचायत जळगाव खुर्द तिघ्रे खिर्डी यांनी तिघे्र शिवारातील जमिन गट नंबर-१ मधील मुरुम उचलण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. परंतु तरी देखील संबंधित कंत्राटदाराने गट नंबर १ मधील मुरुच न उचलता त्यांनी ३१ मार्च २०१८ ते २६ मार्च २०१८ या कालावधीत तिघ्रे शिवारातील शेत गट नंबर १४ मधील ७३१ ब्रास २ लाख १९ हजार ३०० रुपये किंमतीचा मुरुम चोरीच्या इराद्याने चोरुन नेला. याप्रकरणी जगन्नाथ बळीराम महाजन (वय-६७, रा. जळगाव खुर्द) यांच्या ङ्गिर्यादीवरुन नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनिल मोरे हे करीत आहे.