Home क्राईम नाशिक कृउबा सभापतीला लाच घेताना अटक

नाशिक कृउबा सभापतीला लाच घेताना अटक

0
113

krushi bajar samiti
 

नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांना तीन लाख रुपयांची लाच घेताना आज रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडालेली असून चर्चेला उधाण आले आहे.

 

कामावरून कमी करण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेण्यासाठी चुंबळे यांनी १० लाख रुपयांची मागणी केली होती. संबंधित कर्मचारी आणि चुंबळे यांच्यात घासाघीस होऊन अखेर ३ लाखांवर सौदा पटला होता. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे याबाबत तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानुसार एसीबीचे अधीक्षक सुनील कडास यांनी स्वत: चुंबळे यांच्यासाठी ट्रॅप लावला होता. त्यात चुंबळे अलगद सापडले. तीन लाखांची रक्कम घेताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.


Protected Content

Play sound