तालुक्यातील कुसुंबा येथे जुन्या वादातून तरूणावर चॉपर हल्ला

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथे जुन्यावादातून तरूणावर गावातील दोघांनी चॉपर हल्ला केल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघा तरुणांना मारहाण होत असल्याने गर्दी गोळा होवुन हल्लेखोरांनी पळ काढला. जखमी संतोष सुभाष कोळी-राऊत व केदारे अशा दोघांना उपचारार्थ जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी संतोष सुभाष कोळी-राऊत(वय-२२,रा. कुसूंबा आयटीआय जवळ) हा त्याचा मित्र सागर केदारेला घेवून दुचाकीने जात असतांना. सुमेरसींग ढाब्याच्या मागील रेडवर राहुल मराठे व निलेश ऊर्फ बाबा अशांनी वाहन अडवले. मागील भांडणाच्या वेळेस संतोष कोळीने दिलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी शिवीगाळ करुन गाडीवरुन खाली पाडत बेदम मारहाण केली. राहुल मराठेने त्याच्या कंबरेतून धारदार चॉपर काढून पाठीमागून कंबरेत चॉपरने वार केला. रस्तस्त्राव होत असल्याने परिसरातील रहिवाश्यांनी मदतीला धाव घेतल्याने दोघा भामट्यांनी धुम ठोकली. जखमीला जिल्‍हारुग्णालयात दाखल केल्यावर या प्रकरणी प्राणघातक हल्ला चढवल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तपास सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे करत आहेत.

Protected Content