तालुकास्तरावरील समित्यांना स्थगिती देण्यात यावी – विजय महाजन

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील समित्यांमध्ये काँग्रेस पक्षाच्या सदस्यांना स्थान देण्यात आलेले नाही, त्यामुळे तालुकास्तरीय समित्यांना स्थगिती देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या मागणीच्या निवेदनात विजय महाजन यांनी सांगितले की, एरंडोल येथे दक्षता समिती , संजय गांधी निराधार समिती व समन्वय समिती सह सर्व शासकीय समित्या गठीत करण्यात आल्या असल्याचे म्हटले आहे . महाविकास आघाडीत शिवसेना + भारतीय राष्ट्रीय काँग्रेस + राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या ( ६० + २० + २० ) ठरलेल्या फोर्म्युलानुसार या समित्यांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाला एरंडोल तालुक्याला जागा मिळालेल्या नसल्याचे सांगून विनंती केली आहे की उपरोक्त शासकीय समित्यांमध्ये तसेच भविष्यात ज्या समित्या अस्तित्वात येतील त्या समित्यांमध्ये देखील पक्षाचे पदाधिकारी / कार्यकर्त्यांना प्राधान्याने देण्यात यावे तसेच ज्या समित्या गठीत झालेल्या आहे . त्यांना स्थगीती देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Protected Content