तालिबानने अमेरिकेला धमकावलं

 

काबुल : वृत्तसंस्था । ३१ ऑगस्टनंतरही तुमचं सैन्य अफगाणिस्तानमध्ये राहिल्यास त्याचे परिणाम अमेरिकेवर होतील, अशा शब्दांत तालिबानने अमेरिकेला धमकावलं आहे.

 

सैन्य हटवण्यासाठी ३१ ऑगस्टची शेवटची मुदत तालिबानने अमेरिकेला दिली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकन सैनिक काबूलमध्ये राहू शकतात, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं होतं. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतरही अमेरिकेन सैन्य अफगाणिस्तानमध्ये आहे.

 

दरम्यान, तालिबानने काबूलमधून हजारो अफगाणी नागरिक आणि परदेशी लोकांच्या निर्वासनासाठी अमेरिकेला जबाबदार धरले होते. “अमेरिका, त्यांच्या सर्व शक्ती आणि सुविधांसह काबूल विमानतळावर सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरली आहे. केवळ काबूल विमानतळवरील अराजकता वगळता संपूर्ण देशात शांतता आहे,” असं तालिबानचे अधिकारी अमीर खान मुताकी यांनी  म्हटलं होतं.

 

सध्या काबूल विमानतळ सुरक्षित करण्यासाठी हजारो अमेरिकन सैनिक प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानमधून बाहेर देशातील नागरिकांचं स्थलांतर ३१ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अफगाणिस्तानमध्ये सद्यस्थितीत जवळजवळ १५ हजार अमेरिकन आणि ५० ते ६० हजार अफगाणी नागरिक अडकले असून त्यांना बाहेर काढायचं आहे, असं बायडेन प्रशासनानं म्हटलं होतं.

 

Protected Content