मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | लोकप्रिय हास्यप्रधान टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये मिसेस रोशन सिंग सोढी यांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री जेनिफर मिस्त्री यांनी शोचे निर्माते असितकुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यांनी असितकुमार मोदी यांच्या विरोधात पवई पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. पवई पोलिसांनी असित मोदी विरुद्ध भारतीय दंड संहिता च्या कलम 354 आणि 509 अंतर्गत एफआयआर नोंदवला होता. याव्यतिरिक्त त्यांनी कार्यकारी निर्माते जतिन बजाज आणि ऑपरेशन हेड सोहेल रमाणी यांच्या विरोधातही तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी मात्र याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. या प्रकरणी बऱ्याच दिवसांनी मोठी लढाई लढल्यानंतर अभिनेत्रीला न्याय मिळाला आहे. मुंबई पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अभिनेत्रीने महाराष्ट्र सरकारकडे मदत मागितली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या स्थानिक तक्रार समितीने या प्रकरणातील कारवाई तीव्र झाली, कारवाईनंतर असित कुमार मोदी हे चार महिन्यांत कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध आणि निवारण) कायदा २०१३ अंतर्गत दोषी आढळले.
मोदींवर लैंगिक छळाचा गुन्हा सिद्ध होऊनही तिन्ही आरोपींना शिक्षा मात्र झालेली नाही. जेनिफर मिस्त्रीने यापूर्वी तिच्या बाजूने निकाल देऊनही आरोपीला शिक्षा न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. जेनिफरने गेल्या वर्षी असित कुमार मोदी, सोहिल रमाणी आणि जतिन रमाणी यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. आता हे तिघेही दोषी आढळले आहेत. कोर्टाने असित यांना ५ लाख दंड भरण्याची ताकीद दिली आहे. सोबतच त्यांना अभिनेत्रींचे आधीचे पैसेही देण्याचे आदेश दिले आहेत. ही एकूण रक्कम ३० लाखांवर जात आहे.