जळगाव, प्रतिनिधी । तांबापुरा मास्टर कॉलनी परिसरातील मेडिकल बंद असून नागरिकांचे हाल होत असल्याने ते सुरु करण्यात यावेत अशी मागणी तांबापूर फाउंडेशनचे मतीन पटेल यांनी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांना इ-मेलद्वारे केली आहे.
जळगाव शहरातील तांबापुरा, मास्टर कॉलनी परिसरातील मेडिकल गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत. मेडिकल व्यवसाय अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत असतांना परिसरातील मेडिकल बंद आहेत. शहरातील इतर भागातील मेडिकल सुरु असतात. केवळ, तांबापुरा, मास्टर कॉलनी परिसरातील मेडिकल बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत चौकशी करून मेडिकल सुरू करणेचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत अशी मागणी मतीन पटेल यांनी केली आहे.