तांबापुरा दंगलीतील फरार संशयित आरोपीस अटक

जळगाव प्रतिनिधी । तांबापुरा येथे झालेल्या दंगलीत फरार असलेल्या रवींद्र राजू हटकर (३१,रा. गवळीवाडा,तांबापुरा) याला एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी अटक केली.

अधिक माहिती अशी की, रवींद्र हा रिक्षा चालक आहे. तांबापुरा येथे १२ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता हटकर व बावरी गटात दगड फेकून दंगल उसळली होती. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झालेले आहेत. खुनाचा प्रयत्न व दंगल असे कलम यात लावण्यात आलेले आहेत. पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळाल्यावर पोलीस कॉन्स्टेबल अशोक संगत, नितीन पाटील, लुकमान तडवी अशांनी अटक केली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप हजारे व रतिलाल पवार या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Protected Content