अहमदनगर (वृत्तसंस्था) येत्या दोन-तीन दिवसांमध्ये इंदुरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर आम्ही अकोले येथे त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या तोंडाला काळे फासू .तसेच मुख्यमंत्री, अनेक मंत्री तसेच काही राजकारणी मंडळी इंदुरीकर महाराजांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांने हे बंद करावे, अन्यथा त्यांनाही मंत्रालयात कोंडून घेऊन अद्दल घडवू, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे.
इंदुरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी तृप्ती देसाई आज नगरमध्ये आल्या होत्या. देसाई यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन इंदुरीकर महाराजांविरोधात लेखी तक्रार दिली. त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर आम्ही अकोले येथे त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा देसाई यांनी दिला आहे. मुख्यमंत्री, अनेक मंत्री तसेच काही राजकारणी मंडळी इंदुरीकर महाराजांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांने हे बंद करावे, अन्यथा त्यांनाही मंत्रालयात कोंडून घेऊन अद्दल घडवू, असे त्या म्हणाल्या.