सातारा (वृत्तसंस्था) लॉकडाऊन किती दिवस ठेवणार, यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे. लॉकडाऊन काढला नाही तर आता लोक गप्प बसणार नाहीत. त्यांच्या घरातच अन्नधान्य नसेल, हाताला कामच नसेल तर त्यांनी जगायचं कसे?, आगोदरच कोरोनामुळे जगात वातावरण विस्कळीत झाले आहे. आर्थिक परिस्थिती पाहिली तर चोऱ्या-माऱ्या लुटमार सुरू होईल, ते काही स्वखुशीने नाही तर पर्याय नसल्याने घडेल, या संभाव्य धोक्याबाबत माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्राला सावध केले आहे.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत उदयनराजे म्हणाले की, कोरोना किती काळ टीकणार? हे कोणीही सांगू शकत नाही. संपुर्ण देशभरातली लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संदर्भात दक्षता घेण हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण आपली काळजी घेतली तर आपोआप कुटुंबही सुरक्षित राहणार आहे. ज्याप्रमाणे सज्ञान झाल्यावर मतदानाचा हक्क असतो तसे सज्ञान झाल्यावर स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेण ही तुमची जबाबदारी आहे. आर्थिक परिस्थिती पाहिली तर चोऱ्या-माऱ्या लुटमार सुरू होईल, ते काही स्वखुशीने नाही तर पर्याय नसल्याने घडेल. ही परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे पोलिसांची कुवत पुरेशी नाहीय. जे कोणी सत्तेत असतील त्या प्रमुख मंडळींनी एकत्र बसुन यावर तात्काळ तोडगा काढावा. लोक ऐकणार नाहीत, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेत उदयनराजे यांनी दिला. परिणामी लॉकडाऊन तुम्हाला उठवावाच लागणार आहे. धान्य पुरवताय हे ठिक आहे, पण किती काळ पुरवणार? देशाची लोकसंख्या काही थोडी नाही. केंद्र आणि राज्ये यांनी एकत्र बसून चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे. हे मी बोलत नाही तर जनता बोलते, लोक म्हणतात आम्ही गप्प बसणार नाही.