जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धानवड येथे काही जणांनी शेतकऱ्याच्या तुरीच्या पिकाचे नुकसान केले होते या नुकसानाची भरपाई करून द्यावी असे सांगितले असता तीन जणांनी शेतकऱ्यासह त्याच्या वडिलांना लोखंडी पाईप , दगडाने तसेच लाथा बुक्क्यानी मारहाण करून जखमी केल्याची घटना गुरुवार 24 नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
धानवड येथे संदीप लक्ष्मण पाटील व 29 हा तरुण शेतकरी कुटुंबासह वास्तव्यास आहे. गावातीलच रवींद्र नामदेव पाटील, गजानन रविंद्र पाटील ,नामदेव गोविंदा पाटील, या तीन जणांनी संदीप पाटील यांच्या शेतातील तुमच्या पिकाचे नुकसान केले होते. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता संदीप पाटील हा गावातून जात असताना संबंधित तिघांना माझ्या तुरीच्या पिकाची नुकसान भरपाई द्या असे असे सांगितले याचा राग आल्याने तिघांनी शिवीगाळ करत लोखंडी पाईप ने संदीप पाटील यांच्या डोक्यावर मारून दुखापत केली तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केले तसेच संदीप याचे वडील भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही दोघांनी डोक्यात दगड मारून दुखापत केली. या घटनेत संदीप पाटील हे जखमी झाले असून त्यांच्या तक्रारीवरून रवींद्र नामदेव पाटील गजानन रवींद्र पाटील व नामदेव गोविंदा पाटील यातील विरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक मुदतसर काझी हे करीत आहेत .