भुसावळ प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून एकाला लोखंडी रॉड आणि चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी अटक केली.
अधिक माहिती अशी की, शेख नाजीर शेख निसार रा. मणियार हॉल जवळ, भुसावळ यांच्या घराच्या समोरील ड्रेनेन लाईनमध्ये विटा टाकून लाईन जाम केली. याप्रकरणी शेख नाजीर यांची आईने १६ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी शेख नईम शेख जेनुद्दीन वय-40, शेख मोहिन शेख सेफउद्दीन वय-20 आणि शेख मुस्तफा शेख सेफउद्दीन वय-19 सर्व रा.मणियार हॉल जवळ भुसावळ यांना विचारणा करण्यासाठी गेले असता. संशयित तीनही आरोपींनी गल्लीत राहणाऱ्या शेख नाजीर शेख निसार याला लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. यात शेख नाजीर शेख निसार हा गंभीर जखमी झाला. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर तीनही आरोपी फरार होते. आज भुसावळातील खडका चौक परिसरातून शेख नईम शेख जेनुद्दीन, शेख मोहिन शेख सेफउद्दीन आणि शेख मुस्तफा शेख सेफउद्दीन या तिघांना अटक केली आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल मोरे, पोना किशोर महाजन, रविंद्र बिऱ्हाडे, उमाकांत पाटील, रमण सुरळकर, महेश चौधरी, पोकॉ विकास सातदिवे, कृष्णा देखमुख, प्रशांत परदेशी यांनी कारवाई केली.