तरूणाच्या हातातील महागडा मोबाईल लांबविणारे गजाआड; शनीपेठ पोलीसांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । नेरीनाका स्मशानभूमी परिसरात उभा असलेल्या तरूणाच्या हातातून महागडा मोबाईल आणि रोकड जबरी हिसकावून पळ काढणाऱ्या तिन संशयित आरोपींना शनीपेठ पोलीसांनी आज अटक केली. दोघांवर शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, योगेश कैलास शिरसाळे (वय-१९) रा. नेरी नाका स्मशानभूमी जळगाव हा आपल्या आई वडीलांसह राहाते. नुतन मराठा महाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्गाला असून अजिंठा चौफुली जवळील भारत मोटार गॅरेज दुकानावर काम करून घरात आर्थिक हातभार लावतो. २७ जून रोजी दुपारी १ वाजता योगेश हा अमोल वडनेरे या मित्राला घेण्यासाठी दुचाकीने नेरीनाक्याकडून जात असतांना रस्त्यावर पाऊस सुरू झाला. दरम्यान, पावसापासून बचाव व्हावा यासाठी योगेश हा नेरीनाका स्मशानभूमीजवळील आसोदा मटन हॉटेलसमोरील शॉपींग कॉम्प्लेक्स जवळ थांबला. त्याठिकाणी मोबाईलमध्ये पाहत असतांना दुचाकीवर अचानक तीन जण आले. त्यानी योगेशचा मोबाईल जबरी हिसकावला व खिश्यातील ३०० रूपये घेवून दुचाकीने पळ काढला. योगेशने लागलीच तिघांचा दुचाकीने पाठलाग केला. याच दरम्यान तिघेजण का. ऊ कोल्हे विद्यालयाकडे जात असतांना तिघे दुचाकीवरून घसरले. तिघांनी दुचाकी सोडून पळ काढला. चोरट्यांची दुचाकी घेवून शनीपेठ पोलीसांच्या स्वाधिन केली. योगेशच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

गुन्हा दाखल होताच पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित दोन आरोपी संदीप तुकाराम सोनवणे (वय-२५) रा. मारोती पेठ, कोल्हे वाडा, प्रशांत चौधरी आणि गोकुळ पांडूरंग जाधव (वय-२७) रा. पाटील वाडा मोरोती पेठ जळगाव या दोन्ही संशयित आरोपीना अटक केली असून दोघांवर शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. लिलाधार कानडे, पोलीस उपनिरीक्षक परदेशी, पोहेकॉ परिस जाधव, पो.ना. अभिजित सौदाणे, पो.ना. अमोल विसपूते, पो.कॉ. राहूल पाटील,  राहूल घेटे, पो.कॉ. मुकुंद गंगावणे, पो.कॉ. अनिल कांबळे यांनी कारवाई करत मोटारसायकलच्या नंबरवरून तीघांना अटक केली आहे.

 

Protected Content