तरूणाची दुचाकी लांबविणाऱ्या तिघांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील शिरसोली येथील तरुणाची दुचाकी लांबविणार्‍या टोळीच्या एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तिघेही सराईत गुन्हेगार असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात बारी नगरात राहणारा  केतन गोपाल बारी (वय-२३) या तरुणाची घरासमोरुन दुचाकी लांबविल्याची घटना ३० जून रोजी घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, भुसावळ शहर पोलिस ठाण्यातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात कारागृहात असलेले भुषण नितीन तावडे (वय-२०), निखित सुधाकर तावडे (वय-२०) व पंकज दंगल तावडे (वय-२४) सर्व रा. चिरणे कंदाणे ता. शिंदखेडा जि. धुळे यांना एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्याकडील गुन्ह्यात ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपणच शिरसोली येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली देत चोरी केलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली. पुढील तपास पोलिस करीत आहे. मंगळवारी २ ऑगस्ट रोजी तिघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 

Protected Content