तरुणास गंभीर जखमी करणारे तिघे हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे प्रेम प्रकरणातून एका तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्यातील तिघा संशयित आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.

 

याबाबत यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, जावेद युनुस पटेल (वय २२ रा. देशपांडे गल्ली, यावल) हा मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. त्यास फैजपूर येथील शेख मुजम्मील उर्फ मुज्जू शेख हकीम (वय २६), हिदायत आली उर्फ राजू शेखावत (वय २०), शेख शोएब शेख इकबाल खाटिक (वय २९)( तिघे राहणार ताहानगर फैजपूर) यांनी शुक्रवार दि. ६ मे रोजी दुपारी २.३० ते ३.३० वाजेच्या दरम्यान यावल भुसावळ रस्त्यावरील पीर बाबांच्या दर्ग्याजवळील खोलीच्या मागे प्रेमप्रकरणातून चाकूने प्राणघातक हल्ला करून जखमी केले होते.जखमी जावेद पटेलवर जळगाव येथे सिव्हील हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. याप्रकरणातील तीघ आरोपी घटनेपासून फरार होते. त्यांना फैजपुर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ . कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यावलचे सहाय्यक पोलीस अधिक्षक आशित कांबळे , पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर यांच्यासह पोलीस पथकांनी शुक्रवार दि. ६ मे रोजी रात्री १०.४० वाजेच्या सुमारास अटक केली आहे.

Protected Content