रावेर येथील रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार – आ. चौधरी यांच्याकडून चौकशीची मागणी

रावेर प्रतिनिधी । आमदार शिरीष चौधरी यांनी हिवाळी अधिवेशनात ऑनलाइन तारांकित प्रश्न उपस्थित करून रावेर मतदारसंघातील रस्त्यांवरील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाची कामे होत असून या कामांची माध्यमांनी वेळो-वेळी वाचा फोडली आहे. याला प्रमुख जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्यांच्या दुर्लक्षमुळे निकृष्ट कामे होत आहे. या कामांची दखल सत्ताधारी आमदार शिरीष चौधरी यांना घ्यावी लागत आहे.

रावेर तालुक्यात करोडो रुपये खर्च करून शासन रस्ते तयार करत असते परंतु निकृष्ट दर्जाच्या मट्रेलमुळे करोडो रुपये पाण्यात गेले आहे. यामध्ये मोठा भ्रष्ट्राचार झाल्याची ओरड असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीका-यांचे सर्लास दुर्लक्ष होत असल्याने रस्ते काही महिन्यात खराब झाले आहे.नविन रस्त्याचा दर्जा घसरत असल्याने जनतेत नाराजीचा सुर असुन या प्रकरणी आमदार शिरीष चौधरी यांनी गेल्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

रावेर तालुक्यातील रस्त्यां बद्दल अधिवेशनात तक्रार

आताच संपन्न झालेल्या अधिवेशनात आमदार शिरीष चौधरी यांनी आदिवासी भागातील रावेर-पाल रस्ताची दयनीय अवस्था झाली असून चौकशीची मागणी केली आहे. तर विवरा बलवाडी रस्ता चार महिन्यांपूर्वीच सुमारे सात कोटी रुपये खर्च करून केला परंतु निकृष्ट झाल्याने दर्जा घसरल्याने यात देखिल भ्रष्ट्राचार झाल्याची तक्रार आमदार शिरीष चौधरी यांनी अधिवेशनात केली आहे. मागील आठवड्यात वाघोदा नजिक सुमारे १८ लाख रुपये खर्च करून पुलाचे काम निकृष्ट करून भ्रष्टाचार करण्याच्या तयारीत असलेल्या कामाचा ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने बातमी प्रसिध्द करून पर्दापाश केला होता.

विवरा-बलवाडी रस्त्यामध्ये भ्रष्टाचार

विवरा-बलवाडी हा प्रमुख जिल्हा मार्ग असलेला रस्ता चार महिन्यापूर्वी नवीन तंत्रज्ञान ( सॉईल स्टेबीलायझेशन ) चा वापर करून तयार करण्यात आला होता.परंतु चार महिन्यात या रस्त्याचे तीन तेरा झाल्याने सात कोटी रूपये पाण्यात गेल्याने या रस्त्यात ठेकेदाराने अधिकाऱ्यांशी संगमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याची तक्रार अधिवेशनात ऑनलाइन तारांकीत प्रश्न उपस्थित करून तक्रार केली आहे.दरम्यान नवीन तंत्रज्ञान ( सॉईल स्टेबीलायझेशन हा प्रायोजिय तत्वावर रस्ता केला होता.आता पर्यंत सुमारे चार कोटी खर्च झाले असून काही ठिकाणी खराब झाल्याचे शाखा अभियंता एम डी तायडे यांनी सांगितले.

Protected Content