पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याच्या कारणावरून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील बोल्डार या गावात घडली. यानंतर ठिकठिकाणी या घटनेचे पडसाद उमटू लागले आहे. त्यात आता पाचोरा तालुक्यातही मारेकऱ्याचा निषेध नोंदविण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील बोल्डार या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणुन काही मनुवादी वृत्तीच्या समाज कंटकांनी अक्षय भालेराव या तरुणाची १ जुन रोजी निघृण खुन केला. या घटनेच्या निषेधार्थ जळगांव (पश्चिम) वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे आज ७ जुन रोजी प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार प्रविण चव्हाणके, पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगिता साळुंखे, मा. तालुका अध्यक्ष अनिल लोंढे, तालुका उपाध्यक्ष सुनिल कदम, समता सैनिक दलाचे मेजर संतोष कदम, नगरदेवळा शहर अध्यक्ष किरण कदम, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा संजीवनी रत्नपारखी, सुनिल सुरडकर, शांताराम खैरे, वाल्मिक पवार, रत्ना खैरे, पौर्णिमा सोनवणे, कांता कदम, उषा ब्राह्मणे, आकाश बनसोडे, अनंत मोरे, नाना अहिरे, छन्नु सोनवणे, मनोज नन्नवरे, अजीम शेख, रविंद्र बाळदकर, धर्मा खेडकर, दिलीप बागुल उपस्थित होते. दरम्यान मराठवाड्यातील नांदेड शहराला लागुन असलेल्या बोल्डार गावात हि घटना घडली असून आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवरुन वाद होतात व कुणाच्या तरी निष्पाप रक्ताने त्याचा शेवट होतो. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तरी अक्षय भालेराव या तरुणाच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी. शासनातर्फे अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी अशा आषयाचे निवेदन वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे पाचोरा प्रशासनास देण्यात आले आहे.