एरंडोल येथे पोलीस व नगरपालिका प्रशासनाची संयुक्त दंडात्मक कारवाई

 

एरंडोल, प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने एरंडोल पोलीस स्टेशन व नगरपालिका यांनी संयुक्त कारवाई करत ५० व्यक्तींची मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या लग्न समारंभांवर व मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून सोळा हजार रुपये वसूल केले आहेत. 

कोरोनाने पुन्हा जिल्ह्यात प्रवेश केलेला असून मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने जिल्‍हाधिकारी यांच्या आदेशाने एरंडोल पोलीस स्टेशन व नगरपालिका यांनी सामुहिक कारवाई करून लग्न समारंभाच्या ठिकाणी व गर्दीच्या ठिकाणाहून जमलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली त्यातून सोळा हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.  लग्न समारंभाच्या तीन ठिकाणी नगरपालिका कर्मचारी व पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर धडक मोहीम राबवून मास्कचा न वापरणाऱ्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.  एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, मुख्याधिकारी किरण देशमुख, विलास पाटील, विकास खैरनार, संतोष चौधरी या पोलिस कर्मचाऱ्यांसह विनोद पाटील, एस. आर. ठाकूर, राहुल ठाकूर या पथकाने कारवाई केली आहे. तरी व्यापारी व नागरिकांनी कटू प्रसंग टाळण्यासाठी कोरोना संदर्भात शासनाने आदेशित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी किरण देशमुख, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले आहे.

 

 

Protected Content