तबलिगी मरकजचे प्रमुख मौलाना साद यांच्या विरूध्दात ईडीचा गुन्हा

नवी दिल्ली । तबलिगी जमात मरकजचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपाखाली सक्तवसुली संचलनालयाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौलाना साद यांच्या संस्थेला परदेशातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत असून त्याची कोणतीही माहिती सरकारला देण्यात आली नसल्याचा सक्तवसुली संचलनालयाला संशय आहे. या अनुषंगाने ईडी म्हणजेच सक्तवसुली संचलनालयाकडून मौलाना साद यांच्या आठ सहकार्‍यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरकजला मिळालेला निधी मनी लॉण्ड्रिंगचा भाग होता की हवालाचा वापर करण्यात आला याचा तपास करत आहेत. दरम्यान आयकर विभागदेखील जाहीर न केलेलं उत्पन्न, विश्‍वस्तांकडून आयकर चोरीचा प्रयत्न आणि निधीचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करण्यात आला का ? याचा तपास करणार आहे. दिल्ली पोलिसांनी लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मौलाना साद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर लागलीच ईडीकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content