तंत्रस्नेही शिक्षकांचा डिजिटल दिवाळी अंक

 

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूहातर्फे या वर्षीही तंत्र दिपोत्सव हा डिजिटल दिवाळी अंक काढण्यात येणार आहे. यात लेखकांकडून साहित्य मागविण्यात येत आहे.

महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूहातर्फे लॉकडाऊनच्या कालावधीत ऑनलाइन शाळा व झेडपी लाइव्ह एज्युकेशन यासह विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले. यासोबत आता तंत्र दीपोत्सव हा दिवाळी अंक देखील काढण्यात येणार आहे. या अंकात तंत्रज्ञान विषयक लेख, चारोळी, कविता, प्रवास वर्णन, पाककृती, गावाकडची दिवाळी, चित्रकाव्य, अनुभवाचे बोल, माझा विद्यार्थी, माझी पहिली कार्यशाळा यासह बालकथा, वैज्ञानिक दृष्टीकोन, रांगोळी, रेखाचित्र या विषयांवर माहिती साहित्य मागवण्यात आली आहे. ३ नोव्हेंबरपर्यंत ही माहिती समिती सदस्यांकडे पाठवण्याचे आवाहन तंत्रस्नेही शिक्षक समूहाचे सदस्य जितेंद्र गवळी, राज्य समन्वयक भालचंद्र भोळे, समाधान अहिरे, सुनील बडगुजर, ओंकार भोई यांनी केले आहे.

Protected Content