मू. जे. महाविद्यालायात बी. ए. ,एम. ए. तत्वज्ञान विषयाचा नवीन अभ्यासक्रम सुरु

81

जळगाव, प्रतिनिधी | मू. जे. महाविद्यालायाच्या तत्वज्ञान विभागातर्फे यंदापासून समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या बी. ए. तत्वज्ञान ,एम. ए. तत्वज्ञान आणि चेतना विकास प्रमाणपत्र या विषयाचा नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.

मानवाचा सर्वांगीण विकास त्याच्या बालपणांपासून होत असतो. यातूनच मानवाच्या ‘स्व’ चा विकास होत असतो. तत्वज्ञान हा एक विचार प्रधान विषय असून त्याला सर्व ज्ञानशाखांचा आरंभ बिंदू मानले जाते. यातूनच मानव, समाज आणि राष्ट्राचा विकास साधला जातो तसेच यु पी एस सी आणि एम पी एस सी या सारख्या स्पर्धा परीक्षांमध्येही या विषयांचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो. याच उद्देशाने २०१९–२० या शैक्षणिक वर्षात मू. जे. महाविद्यालयाच्या तत्वज्ञान विभागातर्फे बी. ए. आणि एम. ए. चेतना विकास प्रमाणपत्र या अभ्याक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. याच विषयाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुद्धा सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासाक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी फायदा घ्यावा असे आवाहन विभाग प्रमुख डॉ. रजनी सिन्हा यांनी केले आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content