शॉर्टसर्किटमुळे एमआयडीसीतील बारदान गोडावूनला आग; 8 लाखाचे नुकसान

जळगाव प्रतिनिधी । शॉर्टसर्किटमुळे एमआयडीसीतील बारदान गोडावूनला अचानक लागलेल्या आगीत सुमारे ७० हजार रूपये किंमतीचा बारदान जळून खाक झाले आहे. ही घटना १७ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. आज १८ मार्च रोजी एमआयडीसी पोलीसात आगीची नोंद करण्यात आले आहे. 

दिलेल्या फिर्यादीनुसार, सत्यानारायण रामप्रताप बालदी (वय-६४) रा. जळगाव यांचे एमआयडीसीतीत ई-सेक्टरमधील दालमील कंपनी आहे. १७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कंपनीच्या आवारात असलेल्या बारदान गोडावून मध्ये अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच कंपनीत काम करणाऱ्या मजूरांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. तोपर्यंत आगीने मोठा भडका घेतला होता. महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला बोलावून रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ही आग विझविली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली अशी माहिती एमआयडीसी पोलीसांनी दिली. लागलेल्या आगीत सुमारे 8 लाख रूपये किंमतीचा किंमतीचा मुद्देमाल जळून खाक झाले आहे. सत्यानारायण बालदी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

Protected Content