जामनेर, प्रतिनिधी | बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेवालाल महाराज यांचे २१ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील अंबिल्होल व डोहरी तांडा येथे संत सेवालाल महाराज यांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जामनेर तालुक्यातील डोहरी तांडा येथे येत्या २१ ऑगस्ट रोजी संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा व कलषरोहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्ञमहंत बाबुसिंग महाराज (पोहरादेवी ) माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, बंजारा समाजाचे उद्योजक किसनराव राठोड, महंत रायसिंग महाराज (रायगड), महंत जितेंद्र महाराज (पोहरादेवी), चैतन्य महाराज महंत शांती, श्याम चैतन्य महाराज, भगवान महाराज, सागर महाराज, कमर सिंग महाराज, तारा दास महाराज यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे. सदर कार्यक्रम हे डोहरी तांडा येथील सेवालाल महाराज मंदिर येथे होणार आहे. यामुळे
१९ ,२० ऑक्टोंबर रोजी रात्री आठ वाजता भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान स्मारकाचे आगमन १८ ऑक्टोबर रोजी अंबिल्होल येथे आगमन झाले आहे. यावेळी परमपूज्य सागर.जी. महाराज हे उपस्थित होते. तत्पूर्वी मूर्तीचे आगमन होताच गावातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.