Home आरोग्य कोरोना : आज जिल्ह्यात आढळले ९ कोरोना बाधित रूग्ण

कोरोना : आज जिल्ह्यात आढळले ९ कोरोना बाधित रूग्ण

0
100


जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात नऊ रूग्ण आढळून आले असून दोन रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

 

जळगाव‍ जिल्ह्यात आज जळगाव शहर ४ , अमळनेर १, एरंडोल ३ व मुक्ताईनगर तालुका १ असे एकूण ९ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर आज दोन रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७७० रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १७ रूग्ण सध्या विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. आजपर्यंत २ हजार ५७७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली.

 


Protected Content

Play sound