डोणगाव येथे तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धचे आयोजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डोणगाव येथील इंग्लीश स्कुलच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धत विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

३० व ३१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ८ ते स्पर्धा संपेपर्यंत डोणगाव किनगाव रोडवरील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुल किनगाव येथे होणार आहेत. महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद जळगांव अंतर्गत यावल तालुकास्तरीय,पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांच्यासाठी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम खालील प्रमाणे असणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंनी ओळखपत्राच्या फोटोवर सही व शिक्का असलेले परिपूर्ण माहिती भरलेले ओळखपत्र आवश्यक आहे.सदरच्या ३०व३१डिसेंबर रोजी होणाऱ्या या स्पर्ध बाबत सकाळी ८ वाजे पासुन ज्या खेळात सहभागी होणार आहे त्या स्पर्धेत सहभाग घेतल्या बाबत संम्बधीत टेबल वर रिपोटींग करावी अन्यथा आपण गैरहजर आहे असे समजण्यात येईल, या स्पर्धत सहभागी होणारे खेळाडू हे स्पोर्ट्स किट (गणवेश) मध्येच असणे बंधनकारक राहणार असुन यात पुरूषांनसाठी हाफ पॅट टी शर्ट तर महीला खेळाळू साठी पंजाबी ड्रेस (पांढरा असल्यास चांगले राहिल) स्पर्धेत येतांना सोबत एक वेळेचा पुरेसा जेवणाचा डबा सोबत आणावा तसेच खेळाडूंनी सदर स्पर्धेत कोणतेही मद्म सेवन करून आल्यास स्पर्धेत सहभागी करून घेतले जाणार नाही इ.नियम पाळणे खेळाळूंना बंधन कारक राहील असं पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, गटशिक्षणाधिकारी नईमोद्दीन.के.शेख, मुख्याध्यापक के.यु.पाटील समन्वयक क्रीडा समिती यांनी माहिती दिली.

Protected Content