डोंगर कठोरा येथे सुंदरकांड हनुमान कथा सप्ताहाची सांगता

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डोंगरकठोरा येथे सुंदरकांड हनुमान कथा सप्ताहाची भव्य मिरवणुकीने सांगता करण्यात आली.

तालुक्यातील डोंगर कठोरा येथे ग्रामदैवत श्री.महादेव मारोती मंदिरा मध्ये विराजमान श्री. कष्टभंजन देव हनुमान महाराजच्या कृपेने तसेच प.पू.ध.धू.१००८ आचार्य श्री राकेशप्रसादजी महाराज व स. गु. को.स्वा.प्रेमप्रकाशदासजी(प्रभूस्वामी) मालोद यांच्या आशिर्वादाने श्री. पंचवटी नवतरुण मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने दि.३० मार्च ते ०६ एप्रिल या कालावधीत श्री. संगीतमय सुंदरकांड(हनुमान कथा) सप्ताह ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील कथेचे वक्ता स. गु. शा. स्वा.सरजूदासजी व्यासासनारुद होऊन संगीतमय सुरवलीसह सुंदरकांड कथे चे रसपान केले, दि.६ एप्रिल रोजी हनुमान पूजन तसेच महाप्रसाद व दिंडी सोहळ्याचे तसेच शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त संपूर्ण गावातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली यात लहान पासुन थोरांपर्यंतांचा या कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता हे विशेष!

या सप्ताह सोहळ्या दरम्यान दि.३० मार्च रोजी दु.५:३० वाजता चंद्रकांत जगन्नाथ भिरूड यांच्या घरून पोथीयात्रा,रात्री १०:१० वाजता श्री.स्वामीनारायण जन्म सोहळा,दि.३१ मार्च रोजी श्री.राम हनुमान मिलन,दि.२ एप्रिल रोजी श्री.हनुमान जन्मोत्सव,दि.६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १२ महाप्रसाद व संध्याकाळी ६ वाजल्यापासून संपूर्ण गावातून शोभायात्रा काढण्यात आली.

सदर कथेचे यजमान कै.वा.जगन्नाथ भगवान भिरूड,कै.वा.सौ.सुमनबाई जगन्नाथ भिरूड यांच्या मोक्षार्थ चंद्रकांत जगन्नाथ भिरूड यांनी केले होते तसेच महाप्रसाद यजमान चि.पवन नितीन भिरूड यांच्या जन्मानिमीत्ताने शेतकरी गुळ उद्योग डोंगर कठोरा संचालक नितीन भागवत भिरूड व युवराज भागवत भिरूड यांच्या वतीने महाप्रसाद(गाव वेस पंगत) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदरील सप्ताह कार्यक्रमाला प.पु.महामंडलेश्वर श्री.जनार्दन हरिजी महाराज फैजपूर,प.पु.स.गु.शास्त्री धर्मस्वरूपदासजीभुसावळ,प.पु.स.गु.शास्त्री स्वरूपानंदजी डोंगर कठोरा, प.पु.स.गु.शास्त्री भक्तीकिशोरदासजी सावदा गुरुकुल,प.पु.स.गु.शास्त्री जगत्पावन स्वामी सुना सावखेडा, प.पु.स.गु.नयनस्वामी जळगाव, प.पु.स.गु.शास्त्री मधुसूदन महाराज महेलखेडी,प.पु.स.गु.शास्त्री राजेंद्रप्रसादजी यावल, प. पु. स. गु.शास्त्री विश्वप्रकाशदासजी हिंगोणा,प.पु.स.गु.कोठारी पी. पी. स्वामी बर्‍हाणपूर,प.पु.स.गु.शास्त्री ऋषीप्रसाददासजी भुसावळ गुरुकुल, भारूड सम्राट विठ्ठल महाराज वाघाडी यांच्या प्रमुख उपस्थिती या सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सप्ताह सोहळ्यास पंचवटी महादेव मारोती मंदिर,नवतरुण दुर्गात्सव मंडळ, श्री.स्वामीनारायण मंदिर,शीतलामाता दुर्गात्सव मंडळ, पंचवटी विठ्ठल मंदिर,बालगोपाल दुर्गात्सव मंडळ,गढीवरील विठ्ठल मंदिर,संमिश्र मित्र मंडळ,रामभरोसे गणेश मंडळ,आराधना दुर्गात्सव मंडळ व समस्त डोंगर कठोरा ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.सप्ताह सोहळा यशस्वितेकरिता श्री.पंचवटी नवतरुण मित्रमंडळ व समस्त ग्रामस्थ डोंगर कठोरा यांनी परिश्रम घेतले.

Protected Content