डोंगर कठोरा येथे शेतमजुराची आत्महत्या

यावल,  प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगर कठोरा येथील एका शेतमजुराने विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असून ,यावल पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

 

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की,  भागवत बळीराम शिरोळे ( धनगर ) (वय ५५ वर्ष रा. खालचे गाव डोंगर कठोरा ता. यावल ) यांने  रविवार दि १३ जुने रोजी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास खालचे गाव लगत शिवारातील शालीक रामचंद्र फिरके यांच्या शेतातील विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली., गावातील पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या मदतीने मयत भागवत शिरोळे यांचा  मृतदेह विहीरीतुन काढण्यात आला.  यावलच्या ग्रामीण रुग्णालयात मयताचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आण्यात आले आहे. मयत भागवत शिरोळे याच्या मृत्यु पश्चात पत्नी व दोन मुल असुन , कोरोना संसर्गाच्या काळात मयत आणि  त्याची पत्नी हे कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक माहीतीत समोर आली आहे. यावल पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे .

Protected Content