जळगाव प्रतिनिधी | डॉ. उल्हास पाटील मेडिकलमधील कार्डिओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
नागपूर येथून एमबीबीएस तर मुंबई येथून डीएम कार्डियोलॉजीस्टची पदवी संपादन केलेले हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील यांचा आज वाढदिवस.. त्यानिमित्त गोदावरी फाऊंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवित वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच उत्तरोत्तर आपली प्रगती होवो असे आशिर्वाद ज्येष्ठांनी दिले. यात विशेष म्हणजे हॉर्टिकल्चर येथील ४० गुंठे इतक्या परिसरात वैभव केशर मँगो बागेचे उदघाटन करण्यात आले असून येथे डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते केशर मँगोच्या रोपाची लागवड करण्यात आली.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी डीएम कार्डियोलॉजीस्ट डॉ.वैभव पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थीतांनी पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डीन डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, सावदा येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्य भारती महाजन, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, भुसावळच्या प्राचार्य अनघा पाटील, अकाऊंटंट योगेश पाटील, विकास जावळे, विकास बेंडाळे, अनंत इंगळे, संजय भिरुड, परेश पाटील, उमाकांत भिरुड आदि उपस्थीत होते.
केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एच.पाटील, ईश्वर जाधव यांनी पुष्पगुच्छ देत डॉ.वैभव पाटील यांना शुभेच्छा दिल्यात. गट ४० मध्ये केशर आंब्याची लागवड डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या परिसरातील गट क्रमांक ४० मध्ये वैभव केसर मँगो बागेत तब्बल ११०० केशर आंब्याची लागवड करण्यात आली. याप्रसंगी रेडिओलॉजिस्ट डॉ.केतकी पाटील, कृषी महाविद्यालयाचे हॉर्टिकल्चर संचालक प्रा.सतीश सावके, परिसर संचालक डॉ.एस.एम.पाटील, प्राचार्य डॉ.पी.आर.सपकाळे, प्राचार्य डॉ.शैलेश तायडे, अतुल बोंडे आदि उपस्थीत होते.
गोदावरी नर्सिंग आणि डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे किवातेवन येथे वाढदिवस साजरा गोदावरी नर्सिंग आणि डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांचा वाढदिवस किवा तेवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, प्रशासकीय अधिकारी राहूल गिरी, डॉ.साकीब सैय्यद, डॉ.चित्रा म्रिधा, डॉ.अमित जैस्वाल, डॉ.अनुराग मेहता, डॉ.भवानी राणा, डॉ.कल्पना देशमुख, डॉ.श्रृती चौधरी, डॉ.प्रज्ञा महाजन, डॉ.निखील पाटील, डॉ.मुकेश शिंदे, डॉ.सुवर्णा सपकाळे, डॉ.चैताली नेवे, डॉ.शैली पारेख, नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रविण कोल्हे, डायरेक्टर शिवानंद बिरादर, मेट्रन संकेत पाटील, प्रा.पियुष वाघ यांच्यासह नर्सिेंग महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.
डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी, कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात डॉ.वैभव पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी परिसर संचालक डॉ.सुधाकर पाटील यांनी डॉ.वैभव पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. सर्वप्रथम महाविद्यालयातील प्रा.मयुरी देशमुख यांनी डॉ.वैभव पाटील यांचे औक्षण केले. याप्रसंगी डॉ.सुधाकर पाटील यांनी भविष्य व वर्तमान काळाचा विचार करुन पुढील वाटचाल करत राहावी व संस्थेस यशाच्या उंच शिखरावर न्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच महाविद्यालयातील सर्व कर्मचारी मनसपासून सहकार्य करतील अशी ग्वाही दिली.
यावेळी व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील, डॉ.पी.आर.सपकाळे, डॉ.शैलेश तायडे, डॉ.एस.एम.राठी, प्रा.सतीश सावके, प्रा.प्रविण देवरे, डॉ.कुशल ढाके, अतुल बोंडे उपस्थीत होते. यावेळी कृषी महाविद्यालयाच्या तिन्ही महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते. सूत्रसंचालन प्रा.मोनिका नाफडे-भावसार यांनी तर आभार प्रा.मयूरी देशमखु यांनी मानले.