डॉ. विनोद पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

जळगाव प्रतिनिधी । डॉ. विनोद पाटील यांची मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी निवड करण्यात आली असून या नियुक्तीमुळे विद्यापीठात आनंद साजरा करण्यात येत आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील पध्दती विश्‍लेषक डॉ. विनोद पाटील यांची मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. डॉ पाटील १९९४ पासून विद्यापीठात कार्यरत आहेत. प्रारंभी डाटा एन्ट्री ऑपरेटर त्यानंतर पध्दती विश्‍लेषक म्हणून त्यांनी काम पाहिले. मुंबई विद्यापीठात यापुर्वी २०१२-१३ मध्ये एक वर्ष उपकुलसचिव या पदावर काम केलेले आहे. परीक्षा विभागातील ऑनस्क्रीन मुल्यमापन,ऑनलाईन परीक्षा वितरण, बारकोड यामध्ये डॉ पाटील यांच योगदान आहे. यामुळे त्यांच्या मुंबई विद्यापीठातील नियुक्तीचे स्वागत करण्यात येत आहे.

डॉ विनोद पाटील यांची निवड झाल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ कर्मचार्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. डॉ. विनोद पाटील यांच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु पी. पी. पाटील, प्र कुलगुरु माहुलीकर, कुलसचिव बी. बी. पाटील, परीक्षा, मूल्यमापन मंडळ संचालक बी. बी. पाटील व उमवि कर्मचार्‍यांनीअभिनंदन केले आहे.

Add Comment

Protected Content