डॉ. बाळू पाटील यांना एम डी पदवी : मनन बहुउद्देशीय संस्थेतर्फे गौरव

पारोळा प्रतिनिधी | तालुक्यातील म्हसवे येथील रहिवाशी तथा इगतपुरीचे वैद्यकीय अधिकारी डाँ.बाळू पाटील यांनी प्रतिबंधात्मक व सामाजिक औषधवैद्यक शास्रतून (एमडी) पदवी संपादन करून विभातून द्वितीय आले आहेत.त्यांचा मनन बहुउद्देशीय संस्था वतीने पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

 

सर्वसामान्य कुटूंबातील डॉ.बाळू मधुकर पाटील यांनी अत्यंत हालाखीची परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रात केवळ कठोर मेहनत आणि चिकाटीने दैदिप्यमान यश मिळविले आहे. केवळ पैशाच्या जोरावरच उच्चपदस्थ वर्णी लागते हा समज त्यांनी खोडून काढला असून गुणवत्ता असेल तर परिस्थिती आड येत नाही हे त्यांनी सिद्ध करून विद्यार्थ्यां समोर नवा आदर्श ठेवला आहे. हाच आदर्श विद्यार्थ्यांनी अंगिकारून विविध क्षेत्रात घवघवीत यश संपादन करावे या उद्देशाने सत्कार कार्यक्रम राबविला असल्याचे मनन बहुउद्देशीय संस्थाध्यक्ष विशाल महाजन यांनी सांगितले. दरम्यान, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या हस्ते सत्कार करून डॉ. पाटील यांना गौरविण्यात आले. यावेळी विश्वास चौधरी, बाजार समितीचे सचिव रमेश चौधरी, डाँ. ए डी पाटील,शहादा तालुका आरोग्य अधिकारी डाँ.तुषार मोरे,डाँ.योगेश पाटील,डाँ.संजय रणाळकर,डाँ.अतुल लाडवंजारी,डाँ.चेतन पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा आर बी पाटील यांनी तर आभार विशाल महाजन यांनी मानलेत.

डॉ. पाटील ‘प्रेरणास्त्रोत’

सर्वसामान्य कुटुंबातील डॉ.बाळू मधुकर पाटील यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत वैद्यकीय शिक्षणास सुरुवात करून गुणवत्तेच्या बळावर एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले. एवढ्यावरच न थांबता पुढील शिक्षणाचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नसल्याने केइएम रुग्णालयात प्रतिबंधात्मक व सामाजिक औषधवैद्यक शास्रात शिक्षण घेवून विभागातून द्वितीय येणाच्या बहुमान मिळवला आहे.लवकरच त्यांची जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून वर्णी लागणार असल्याने हलाखीची परिस्थिती ते उच्चपदस्थ अधिकारी हा त्यांचा प्रवास निश्चितच सुखावणारा आहे. परिणामी डॉ. पाटील अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरतील असे गौरव उदगार शिवसेना तालुका प्रमुख प्रा. आर. बी. पाटील यांनी यावेळी काढले.

 

Protected Content