डॉ.पायल आत्महत्या : संशयितांना कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश नको ; संघर्ष मोर्चाच्यावतीने सह्यांची मोहीम

जळगाव (प्रतिनिधी) डॉ.पायल तडवीचा जातीय छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयित आरोपींना राज्यातील कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशास महाराष्ट्र सरकारने परवानगी देऊ नये, यासाठी लोक संघर्ष मोर्चाच्यावतीने गावागावात सह्यांची मोहीम राबवण्यात आली होती. त्याचे निवेदन मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री व समाजकल्याण मंत्र्यांना मेलद्वारे पाठविण्यात आले आहे.

 

डॉ.पायल तडवी हिला आत्महत्येस प्रवृत्त करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांना अन्य वैद्यकीय महाविद्यालात प्रवेशास मनाई करण्याची स्पष्ट भूमिका महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात घ्यावी साठी लोक संघर्ष मोर्चाच्यावतीने गावागावात सह्यांची मोहीम राबविली व त्याचे निवेदन मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री व समाजकल्याण मंत्र्यांना मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले. संशयितांना कोणत्याही स्थितीत जातीयवादी व गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठीशी घालू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. लोक मोर्च्याच्या प्रतिभा शिंदे, कथा वसावे, पन्नालाल मावळे, इरफान तडवी, नुरा तडवी, धर्मा बारेला, सोमनाथ माळी, गाठू बारेला, फुलसिग वसावे, रमेश नाईक ,सचिन धांडे व संजय महाजन यांनी ही सह्यांची मोहीम राबविली. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवीने २२ मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहातील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डॉक्टर हेमा अहुजा (२८), डॉ. अंकिता खंडेलवाल (२७) व डॉ. भक्ती मेहरे (२६) या तिघींनी जातिवाचक शेरेबाजी करून रॅगिंग करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप आहे. आत्महत्येस प्रवृत्त करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांना अन्य वैद्यकीय महाविद्यालात प्रवेशास मनाई करण्याची स्पष्ट भूमिका महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात घ्यावी साठी लोक संघर्ष मोर्चाच्यावतीने गावागावात सह्यांची मोहीम राबविली व त्याचे निवेदन मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री व समाजकल्याण मंत्र्यांना मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले. संशयितांना कोणत्याही स्थितीत जातीयवादी व गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठीशी घालू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. लोक मोर्च्याच्या प्रतिभा शिंदे, कथा वसावे, पन्नालाल मावळे, इरफान तडवी, नुरा तडवी, धर्मा बारेला, सोमनाथ माळी, गाठू बारेला, फुलसिग वसावे, रमेश नाईक ,सचिन धांडे व संजय महाजन यांनी ही सह्यांची मोहीम राबविली. दरम्यान, तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी नायर रुग्णालयात तूर्तास जाता येणार नाही. रुग्णालयाची भूमिका ऐकून घेतल्यानंतर हायकोर्टाच्या न्यायमूर्ती साधना जाधव यांनी त्यांना शिक्षण पूर्ण करण्यास तूर्तास परवानगी देण्यास २१ फेब्रुवारी २०२० नकार दिला होता.

Protected Content