डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात पोळा सण साजरा

जळगाव, प्रतिनिधी  । गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय परिसरात आज पोळा सण उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्जाराजाच्या जोडीचे पूजन करून त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात आले. तसेच  बळीराजाला शाल, श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले. 

 

शेतीतून उत्पादन घेण्यासाठी बळीराजासोबत सर्जाराजा देखील राबत असतो, या सर्जाराजाचे महत्व अधोरेखित करणारा पोळा हा सण यंदा ६ सप्टेंबर रोजी गोदावरी फाऊंडेशन येथे पारंपारिक पद्धतीने साजारा करण्यात आला. याप्रसंगी शेतकर्‍यांनी आपल्या बैलजोडींची सजावट करत त्यांना पूजनाच्या ठिकाणी आणले होते. गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील यांनी बैलजोडीचे पूजन केले. यावेळी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, कृषी महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ. एस. एम. पाटील यांनी बैलजोडीला नमस्कार करत त्यांच्यापुढे धान्याची रास खाण्यास ठेवली. डॉ. उल्हास पाटील यांनी शेतकर्‍यांना शाल, श्रीफळ, टोपी घालून सन्मानित केले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या प्रेरणास्त्रोत गोदावरी पाटील,  हॉर्टिकल्चरचे प्रा. सतीश सावके, प्राचार्य  डॉ. पी. आर. सपकाळे, प्राचार्य  शैलेश तायडे, उपप्राचार्य डॉ. कुशल ढाके आदी उपस्थित होते.

 

Protected Content