‘डॉ.आंबेडकर विचारधारा’ हा विषय रोजगारभिमुख करण्यासाठी प्रयत्न करावा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार डॉ.आंबेडकर विचारधारा हा विषय रोजगारभिमुख करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अंतरराष्ट्रीय केंद्र संरक्षण व सामारिक शास्त्र विभागाचे संचालक  तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर थॉट्स विभागाचे विभाग प्रमुख, तथा अंतरराष्ट्रीय सुरक्षा विषयाचे अभ्यासक प्रा.डॉ.विजय खरे यांनी केले.

 

प्रा.डॉ. विजय खरे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका महत्वाच्या बैठकीसाठी आले होते. तेंव्हा त्यांनी येथील डॉ.आंबेडकर विचारधारा विभागास भेट दिली. यावेळी त्यांनी मानव्यविद्या प्रशाळा आणि समाजिक शास्त्रे प्रशाळेतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

 

 

पुढे बोलतांना प्रा. खरे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध विचार पैलूंवर आज जगसभर अभ्यास व संशोधन केले जात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजातील सर्वच  घाटकांच्या समाजिक, शैक्षणिक,आर्थिक आणि मनोसामाजिक दृष्ट्या समृद्ध करणारे आहेत. आजही त्यांचे विचार प्रासंगिक आहे. परंतु एक अभ्यासक्रम म्हणून जेंव्हा याकडे आपण पाहतो तेंव्हा त्या विषयाची रोजगारभिमुखता बघितली जाते. विचार – तत्वज्ञानाबरोबरच  रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील अशा पद्धतीने काळानुरूप आपण डॉ.आंबेडकर थॉट्स या अभ्यासक्रमात् बदल केला पाहिजे. या विषयांची व्यापकता आणि उपयुक्तात वाढविण्यासाठी डॉ.आंबेडकर थॉट्स हा एम.ए.चा सभ्यासक्रम रोजगाराभिमुख करण्यासाठी विभागाने पुढाकार घ्यावा.तरच हा विचार समाजातील सर्व स्तरातील तरुण तरुणी पर्यंत पोहचतील, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अंतरराष्ट्रीय केंद्र संरक्षण व सामारिक शास्त्र विभागाचे संचालक  तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर थॉट्स विभागाचे विभाग प्रमुख, तथा अंतरराष्ट्रीय सुरक्षा विषयाचे अभ्यासक प्रा.डॉ.विजय खरे यांनी केले.

 

यावेळी डॉ.आंबेडकर विचारधारा विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.राकेश रामटेके, राज्याशास्त्र विभाग प्रमुख डॉ.उमेश गोगडिया, संरक्षण व समारिक शास्त्र विभागाचे डॉ.तुषार रायसिंग, तसेच प्रा. लेकूरवाळे, डॉ.विजय घोरपडे, डॉ.प्रशांत सोनावणे, डॉ.अभय मनसरे, डॉ. समाधान बनसोडे, डॉ. सुभान जाधव, विलास कुमावत,इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती.

Protected Content