Home धर्म-समाज मातृतीर्थावर उसळला जनसागर !

मातृतीर्थावर उसळला जनसागर !

0
114

matrutirth sindhkhed raja

सिंदखेडराजा विशेष प्रतिनिधी । राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती उत्सवानिमित्त येथील मातृतीर्थावर जनसागर उसळला असून लक्षावधी आबालवृध्दांनी वंदन केले आहे.

आज सकाळी सनई चौघड्यांच्या वाद्यात माँ जिजाऊंचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी जाधव कुळातील वंशजानी अभिवादन केले. यानंतर सकाळपासूनच मोठा जनसागर येथे वंदन करण्यासाठी दाखल झाला. खासदार सुप्रिया सुळे, ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खा. प्रतापराव जाधव, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आदी मान्यवरांनी मातृतीर्तावर अभिवादन केले.

दरम्यान, आज जिजाऊसृष्टीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून देश-विदेशातील आबालवृध्दांनी याचा आनंद घेत राजमाता जिजाऊ यांच्या महान कार्याला वंदन केले.


Protected Content

Play sound