डिजीटल सात-बारा उतारा वितरणास प्रारंभ

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | आझादी का अमृत महोत्सव या अभियानाच्या अंतर्गत डिजीटल सात-बारा वितरणास आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

आझादी का अमृत महोउत्सव वर्षानिमित्त मोफत डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ उतारा वितरण विशेष मोहिमेचा शुभारंभ शनिवारी फैजपूर येथील धनाजीनाना महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी शेतकरी बांधवाना आ शिरीष चौधरी यांच्या हस्ते ७/१२ डिजीटल वितरित करण्यात आला. विशेष असे की ह्याचवेळी प्रांताधीकारी कैलास कडलग यांच्या हस्ते आ शिरीष चौधरी यांनी देखील शेतीचा ७/१२ देण्यात आला.या प्रसंगी सोबत प्रांताधिकारी कैलास कडलग , यावल तहसीलदार महेश पवार, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे धनंजय चौधरी व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Protected Content