भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर भागात शनिवार रोजी शासकीय कार्यालये बंद असल्याचे फायदा घेऊन ठेकेदाराने घरमालकांची फसवणूक करून लिंबाचे हिरवेगार जिवंत झाडाची कत्तल करून विल्हेवाट लावली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शनिवार दि. २४ ऑक्टोबर रोजी ठेकेदार सलिम हा शिवाजी नगर भागात लिंबाचे हिरवेगार जिवंत झाडाची कत्तल करीत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिल्याने पत्रकार घटनास्थळी पोहचले असता लिंबाच्या झाडाची कत्तल करण्याचे काम सुरू होते. ज्या जागेवर झाड होते त्या मालकाला विचारण्यात आले ? झाड कापण्याची परवानगी काढली आहे का ? झाड कापणारा व्यक्ती (ठेकेदार) सलिम यांच्या समोर जागा मालकाशी विचारपुस केली जागा मालिकला सलीमने असे सांगितले कि “मी झाड कापण्याची परवानगी मी काढून घेईल” असे सांगून त्या मालकाची फसवणूक केली. हा सलिम नामक व्यक्ती भुसावळतील असे भरपूर झाडांची कत्तल शासकीय कार्यालये बंद असणाऱ्या दिवशी यावल तालुक्यातील मारुळ गावातील आठ ते दहा व्यक्तींना बोलावून शासनाची कुठलीही परवानगी न घेता जिवंत झाडाची कत्तल करून कित्येक लोकांची फसवणूक केली आहे. या ठेकेदारांच्या मनमानी कारभाराबद्दल प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. सदर प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर प्रशासन कारवाई करणार का याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.