ठाकरे-शिंदे सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेवर नेमका कुणाचा हक्क ? यावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत आता पुढची तारीख देण्यात आली आहे.

उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेच्या हक्कावरून न्यायालयीन लढाई सुरू आहे. सुप्रीम कोर्टात आज याबाबत सुनावणी झाली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडे आज सुनावणी झाली. यात ठाकरे गटाचे वकील ऍड. कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याची मागणी केली. घटनापीठाने २०१६ मध्ये सुनावलेल्या नबाम रेबिया विरुद्ध विधानसभा उपाध्यक्ष या प्रकरणातील निकालाची योग्यता ठरवण्यासाठी ठाकरे गटाने ही मागणी केली आहे.

या अनुषंगाने या प्रकरणी आता १० जानेवारी रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय घटनापीठाने दिला. कालच धनुष्यबाण चिन्हावरील लढाईत निवडणूक आयोगाने ५ जानेवारी तारीख दिलेली आहे. या पाठोपाठ सुप्रीम कोर्टात देखील पुढील तारीख मिळाली आहे.

 

Protected Content