ट्रॅक्टरखाली दबल्याने चालकाचा मृत्यू

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सातोद येथील शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करीत असतांना ट्रॅक्टर अचानक पलटी होवून त्याखाली दबुन चालकाचा दबुन जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली.

सातोद येथील विकास झुबा फेगडे यांच्या शेतात देविदास दिनकर पाटील (वय ५८ वर्षे)हे त्यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरने नांगरणी करीत असताना शेता लगतच्या नदीपात्राच्या दरीत ट्रॅक्टरचे चाक गेल्याने ते पलटी होवून ट्रॅक्टरखाली पाटील दबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे. घटनेची हकीकत कळताच पोलीस निरिक्षक अरूण धनवडे आणी त्यांच्या सहका-यानी घटनास्थळी पोहचले ग्रामस्थानी ट्रॅक्टर सरळ करून पाटील यांना बाहेर काढले येथील यावल ग्रामीण रुग्नालयात देविदास पाटील शवविच्छेदन करण्यात आले. विकास फेगडे यांच्या खबरीवरून येथील पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content