
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सपत्नीक राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. डोनाल्ड ट्रम्प आज राष्ट्रपती भवानात राष्ट्रपतींची भेट घेतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात औपचारिक संवाद होणार असून, त्यात काही महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्रम्प यांच्या सन्मानार्थ रात्री जेवणाचे आयोजन केले आहे. दरम्यान, सकाळी ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवनमध्ये औपचारिक स्वागत झाले. येथे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला होता.