चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील हाते ते गलंगीच्या दरम्यान भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली असून यात दोन युवक जागीच ठार झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.
हातेड. गलंगी दरम्यानकाल सायंकाळी भीषण अपघात झाला. घोडगाव येथील कमलाकर बारेला व कुसुंबा येथील गोलू बारेला हे दोन्ही एम एच १९ बी पी ४९४० या क्रमांकाच्या दुचाकीने चोपड्याहून गलंगीकडे जात होते. या मार्गावर पाटचारीजवळ त्यांना मागून ट्रकने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. दरम्यान, अज्ञात वाहनाने दुचाकीला टक्कर दिल्यानंतर त्याचा चालक ट्रकसह फरार झाला.
दुचाकी अपघातामुळे मागून येणार्या ट्रॅक्टरच्या चालकाला अचानक ब्रेक दाबावा लागला. यामुळे त्याची ट्रॉली पलटून सहा-सात मजूर जखमी झाले. रात्री उशीरा दोन्ही पार्थिव रूग्णालयात आणण्यात आले होते. याबात पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.