जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील संभाजी नगरात राहणाऱ्या कपडे शिवणाऱ्या टेलरला अज्ञात व्यक्तीने विश्वास संपादन करून ऑनलाईन पध्दतीने बँक खात्यातून ५४ हजार ८०० रूपये परस्पर वर्ग करून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी २२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, सुभाष शालीग्राम इंगळे (वय-४९) रा. संभाजी नगर, जळगाव हे आपल्या परिवारास वास्तव्याला आहे. त्यांचे टेलरींगचे दुकान असून कपडे शिवून आपला उदरनिर्वाह करतात. १७ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजता ते दुकानात असतांना त्यांना अनोळखी नंबरवरून फोन आला. त्याचा विश्वास संपादन करून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या फोन पे वरून ऑनलाईन पध्दतीने बँक खात्यातील ५४ हजार ८०० रूपये परस्पर वर्ग करून फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनिवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक युनूस तडवी करीत आहे.