वेलिंग्टन । भारत आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात भारताने ९० धावांनी दणदणीत विजय मिळवत ५ सामन्यांच्या मालिकेमध्ये २-० ची आघाडी घेतली आहे.
माऊंट मॉन्गॅनुईमधील बे ओव्हल इथे झालेल्या यामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने जोरदार फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी १५०हून अधिक धावांची भागिदारी केली. रोहित शर्माने ९६ चेंडुंमध्ये ८७ धावा केल्या तर शिखर धवनने ६७ चेंडुंमध्ये ६६ धावा केल्या. त्यांना विराट कोहली, अंबाती रायुडू महेंद्रसिंह धोनी यांनी साथ दिल्याने भारताची धावसंख्या ३२४वर पोहोचली. मात्र याचा पाठलाग करतांना न्यूझीलंडचा संघ ४० षटकांमध्येच २३४ धावांत गारद झाला. या सामन्यात कुलदीप यादवने चार बळी घेतले. भुवनेश्वर कुमारा आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले तर मोहम्मद शामी आणि केदार जाधवला प्रत्येकी एक बळी मिळाला.