चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील टाकळी प्र.चा. भागातील पाटील वखाराच्या पाठीमागे सार्वजनीक ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी पोलिसांना दिली. त्यावर पोलिसांनी लगेच ती जागा गाठून छापा टाकून मुद्देमाल जप्त केले व सहा जणांवर रात्री उशिराने फिर्याद दाखल करण्यात आली.
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तीन दिवसांसाठी शहरात संचारबंदी लागू केली आहे. मात्र तालुक्यातील टाकळी प्र.चा.येथील वखाराच्या पाठीमागे सार्वजनीक ठिकाणी बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून पोलिसांना मिळाली. त्यावर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी आपल्या सोबत पोना संदीप पाटील, पोना शैलेंद्र पाटील, पोकॉं दिपक पाटील, पोकॉं निलेश पाटील व पोकॉं संदीप भोई आदींना सोबत घेऊन या ठिकाणी दि.२९ रोजी दुपारी ३:०० वाजता छापा टाकण्यात आला. यावेळी २,३७० रूपये रोख मिळून आले. यात पत्यांचा ताश खेळताना एकूण सहा जण आढळून आले. त्या सर्वांवर शहर पोलिस ठाण्यात पोकॉं शरद पाटील यांच्या माहितीवरून फिर्याद दाखल करण्यात आली. अशोक झिनकन वर्मा, ज्ञानेश्वर सुरेश सोनवणे, रविंद्र रमेश पवार, राजु विद्य रूसाने व भुषण ओंकार माळी आदींवर हि कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक यांच्या निर्देशानुसार पुढील तपास शैलेंद्र पाटील हे करीत आहेत.