रावेर पंचायत समितीत तिन कर्मचारी पॉझिटीव्ह : ‘एक खिडकी’ द्वारे कामकाज

 

रावेर, प्रतिनिधी । येथील  पंचायत समितीमध्ये तुम्ही येणार असाल तर सावधान कारण येथील तीन जण कोरोना पॉझिटीव्ह तर दोन कर्मचा-यांची फॅमेली बाधीत झाली आहे. त्यामुळे आज पंचायत समितीचे कामकाज  खिडकीद्वारे चालवण्यात येत असून  ग्रामीण जनतेने काम असेल तरच पंचायत समितीमध्ये येण्याचे अवाहन गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी केले आहे.

रावेर तालुक्यात सद्या दोन हजार ९२० पेशंट कोरोना पॉझिटीव्ह आहेत.११० जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. रावेर पंचायत समितीत तीन कर्मचारी कोरोना पॉझीटीव्ह आले आहे. तर दोन कर्मचा-यांची फॅमेली पॉझिटीव्ह आहे. आज दिवसभर पंचायत समितीचे कामकाज खिडकीद्वारे चालवण्यात आले.  पंचायत समितीच्या गेटवर येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. तसेच गट विकास अधिकारी किंवा सभापती उपसभापती यांना कामानिमित्त भेटण्यासाठी येणा-यांना एक एक सोडले जात आहे. तसेच ग्राम पंचायत स्तरावर कोरोना समिती कार्यान्विक करण्यात आली आहे. विना मास्क फिरणा-यांवर दंड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. काम असेल तरच बाहेर फिरण्याचे अवाहन गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी केले आहे.

 

Protected Content