झांबरे विद्यालयात सकारात्मक शालेय आरोग्य उपक्रम

 

जळगाव, प्रतिनिधी । ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत शिक्षकांसाठी सकारात्मक शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम घेण्यात आला.

शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या सकारात्मक शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रमात “तणाव व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्य “या विषयावर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कांचन नारखेडे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. ताणतणाव येऊ नये म्हणून ध्यान धारणा, संगीत थेरेपी, प्रेरणादायी व्हीडिओ यासारख्या माध्यमातून उपचार करता येऊ शकतात असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला समुपदेशक ज्योती पाटील, चंद्रकांत ठाकुर, मुख्याध्यापक डी. व्ही. चौधरी आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content