Home क्राईम ज्वेलर्सच्या दुकानासमोरून एकाची दुचाकी लांबविली

ज्वेलर्सच्या दुकानासमोरून एकाची दुचाकी लांबविली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीपेठेतील महाविर ज्वेलर्स दुकानाजवळून एकाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शांताराम शालीग्राम वाघ (वय-४६) रा. सुरेशदादा जैन नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात.  १४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता शांताराम वाघ हे कामाच्या निमित्ताने नवीपेठ येथील महावीर ज्वेलर्स दुकानाजवळ दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएच ४०१६) ने आले होते. त्यावेळी त्यांनी ज्वेलर्स दुकानासमोर दुचाकी पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्याने ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर बुधवारी १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.


Protected Content

Play sound