नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने अपेक्षेप्रमाणे पक्षात नुकताच प्रवेश करणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उमेदवारी घोषणा केली आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपाने मध्य प्रदेशातून उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल असे बोलले जात आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात कॉंग्रेसचे सरकार कोसळण्याची शक्यता असून शिवराजसिंग चौव्हाण यांची सरकार स्थापनेच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून भाजपाने उदयनराजे भोसले आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर केली आहे.