उदयनराजे आणि आठवले यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर !

नवी दिल्ली/मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि आरपीआय (ए) चे नेते रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजपाकडून आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि आरपीआय आठवले गटाचे रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Protected Content