ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी । ख्यातनाम अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्यावर उपचार सुरू होते.

कालच इरफान खान यांचे निधन झाल्याने मनोरंजन विश्‍व शोकसागरात बुडाले असतांना आज ऋषी कपूर ( वय ६७ ) यांचे निधन झाल्याने बॉलीवुडला धक्का बसला आहे. उपचार सुरू असतांना त्यांची आज शेवटचा श्‍वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते. आज त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने रिलायन्स रूग्णालयात उपचार सुरू असतांना त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. रोमँटीक हिरो म्हणून ऋषी कपूर यांची इमेज असली तरी त्यांनी अनेक वैविध्यपूर्ण भूमिकादेखील तितक्यात ताकदिने साकारल्या होत्या.

आपले वडील राज कपूर यांच्या बरसात या चित्रपटात ते बाल कलाकर म्हणून रूपेरी पडद्यावर झळकले होते. यानंतर बॉबी चित्रपटापासून सुरू झालेली त्यांची कारकिर्द चांगलीच बहरली. त्यांनी एकापेक्षा एक सरस चित्रपटांमधील आपल्या भूमिकांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. ऋषी कपूर यांच्या निधनाने मनोरंजन विश्‍वाला धक्का बसला असून कलावंतांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

Protected Content